Pune News : उद्यानांमधील स्वच्छतेच्या कामाची आमदार शिरोळे यांनी केली पहाणी

एमपीसी न्यूज : एक नोव्हेंबरपासून पुणे शहरातील उद्याने नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या चित्तरंजन वाटिका आणि हिरवाई उद्यानातील स्वच्छता विषयक कामांची आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज, शुक्रवारी पाहणी केली.

याप्रसंगी दत्ता खाडे,  रवि साळेगांवकर, प्रतुल  जागडे, गणेश  बगाडे, जय जोशी, निलेश धोत्रे आदी उपस्थित होते.

कोरोना संसर्गाच्या कारणाने महापालिका उद्याने गेले आठ महिने बंद होती. त्यातील 81 उद्याने एक नोव्हेंबर पासून खुली होणार आहेत. उद्यानात आल्यावर नागरिकांची स्वच्छतेबाबत कोणतीही गैरसोय होऊ नये. उद्यानांमध्ये येणाऱ्या नागरिकांनीही कोरोनाचा फैलाव होणार नाही याची दक्षता घ्यावी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे ‘जब तक दवाही नही तब तक ढिलाई नही’ या प्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन आमदार शिरोळे यांनी नागरिकांना केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.