MLA Sunil Shelke : गावचे गावपण जपा आणि गावचा विकास साधा – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज : काम केले म्हणून श्रेय घेण्यासाठी आलो नाही, तर गावचे गावपण जपा आणि गावचा विकास साधा हे आवाहन करायला मी आलोय, कुलदैवतेच्या साक्षीने सांगतो गहुंजे पाणी पुरवठा योजनेसाठी आम्ही पाठपुरावा केला आहे. (MLA Sunil Shelke) क्षणिक आनंदासाठी गावाला कीड लागून देऊ नका, असे सांगत मतभेद विसरुन, गावचा विकास साधा असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी यावेळी केले.

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांतून सुमारे 4 कोटी 36 लाख रूपये निधीतून सुरु करण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे गहुंजे येथे भूमिपूजन करण्यात आले.

आमदार शेळके म्हणाले की, भूमिपूजनाच्या निमित्ताने मी आपल्याशी सुसंवाद साधायला आलो आहे. गावचा विकास झाला पाहिजे ही अपेक्षा ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांनी करायला हवी. (MLA Sunil Shelke) गावचा विकास व्हावा,यासाठी मिळकतकरातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेऊन गावातील प्रलंबित मिळकतीच्या नोंदी प्रशासनास करायला लावल्या. विकासाची कामे दर्जेदार करून घ्या, असे आवाहनही यावेळी शेळके यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे आमदार शेळके यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. गहुंजे ग्रामस्थांच्या वतीने आमदार शेळके यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. तसेच ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.

 

Cleanliness drive : सांगवीत स्वच्छता अभियान राबवत विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी जयंती केली साजरी

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष राक्षे, माजी पंचायत समिती सदस्य दीपक हुलावळे, कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारीका शेळके,(MLA Sunil Shelke) राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष दीपाली गराडे, सरपंच कुलदीप बोडके, पुणे महानगर समितीच्या सदस्या दिपाली हुलावळे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक नरेंद्र ठाकर, ग्रामीण ब्लॉकचे अध्यक्ष संदीप आंद्रे, देहूरोड शहराध्यक्ष प्रवीण झेंडे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष चंद्रकांत दाभाडे, दतात्रय पडवळ, नारायण ठाकर, नितीन मुऱ्हे, सुनील दाभाडे, सचिन मुऱ्हे आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,” शहराचा विकास साधताना खेडे दुर्लक्षित होता कामा नये. माता-भगिनींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरणार आहे ही आनंदाची बाब आहे.त्यांचे कष्ट कमी होईल आणि वेळही वाचेल, असे खांडगे म्हणाले.(MLA Sunil Shelke) राष्ट्रवादीचा आमदार आल्यावर तालुक्यात कोट्यवधी रूपयांचा विकास निधी उपलब्ध झाला असून विकासकामे होत असल्याचा झंझावात आपण पाहतोय.

ग्रामस्थ संभाजी बोडके, मधुकर बोडके, गुलाबराव बोडके, हिरामण बोडके, उत्तम बोडके, मच्छिंद्र बोडके, गोरक्षनाथ बोडके, संजय बोडके, शीतल बोडके, मंदाकिनी बोडके, हर्षदा बोडके, पूजा बोडके, भामाबाई बोडके, वंदना तरस यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

गहुंजे गावाचा पूल, चौराई देवी मंदिरासाठी निधी, छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या मंदिराच्या उभारणीसाठी पावणे तीन लाख रुपये, रस्ते, वीज, पाणी साठी निधी मिळतोय याचे समाधान. गावात ये-जा करण्यासाठी बस येत असते याचे आम्हाला समाधान आहे, असे उत्तमराव बोडके यांनी प्रास्ताविकात सांगितले.(MLA Sunil Shelke) मंगलप्रभात लोढा यांनी गावासाठी एक रूपयाचाही निधी आजपर्यंत दिला नसल्याचे उत्तम बोडके यांनी सांगितले. निर्गुणराव बोडके यांनी सूत्रसंचालन केले.तर नितीन बोडके व शीतल बोडके यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.