Pune : आमदार सुनील शेळके यांनी दिव्यांगांसोबत साजरा केला विश्व दिव्यांग दिवस

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांनी विश्व दिव्यांग दिवस दिव्यांगांसोबत साजरा केला. कार्ला येथे केक कापून त्यांच्या आनंदात सहभागी होऊन त्यांनी आजचा दिवस साजरा केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, माजी पंचायत समितीचे सदस्य दीपक हुलावळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुदाम कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोणावळा शहर अध्यक्ष जीवन गायकवाड, माजी सरपंच राजू देवकर आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते.
दरवर्षी 3 डिसेंबर रोजी विश्व दिव्यांग दिवस साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण दिव्यांगांसोबत तसेच दिव्यांगांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. हाच धागा पकडून मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिव्यांगांसोबत त्यांचा दिवस साजरा केला. सुनील शेळके यांनी त्यांच्या आनंदात सहभाग घेऊन व्यस्त कामातील काही वेळ दिल्याने त्यांच्या चेह-यावर समाधान ओघळून वाहत होते.
आमदार सुनील शेळके म्हणाले, “दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. दिव्यांग बांधवांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन मिळवून द्यायचे असेल तर लोकप्रतिनिधींनी शासनामार्फत सहकार्य केले पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. कर्तव्य व सेवाभावनेतुन त्यांच्याकडे समाजातील प्रत्येकाने पाहिले पाहिजे. दिव्यांग व्यक्तींना सर्वपरीने सहकार्य करून सक्षम करण्याचा मनोदय देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like