Talegaon Dabhade: आमदार शेळके यांनी कोरोना योद्ध्यांना गुलाबपुष्प देऊन व्यक्त केली कृतज्ञता!

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे शहरात पोलीस, डॉक्टर, नगरपरिषद कर्मचारी यांच्या संचलनाचे आमदार सुनील शेळके यांनी प्रत्येकाला गुलाबपुष्प देऊन स्वागत केले व त्यांच्या सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील 45 दिवस मावळ तालुक्याच्या सुरक्षेसाठी, नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस अधिकारी – कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतेसाठी झटणारे सफाई कर्मचारी हे अत्यावश्यक सेवा देत आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहेत. या कोरोना विरुद्धच्या लढाईत एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढत आहेत, या सर्व योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य आहे, असे आमदार सुनील शेळके म्हणाले.

तळेगाव शहरातील नागरिकांनी या आरोग्यसेवकांचे जे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत स्वागत केले त्याबद्दल त्यांचेही आभार त्यांनी मानले. यावेळी मास्क, सॅनिटायझर वाटण्यात आले. यावेळी सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.