MLA Sunil Shelke : वैष्णवांच्या मेळाव्याला भाजपच्या मेळाव्याचे रूप देण्यामागचे मास्टरमाइंड देवेंद्र फडणवीस

देहूतील नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावरून आमदार सुनील शेळके यांचा भाजपवर घणाघात

एमपीसी न्यूज – देहू येथील श्री संत तुकाराम मंदिरातील शिळा मंदिरातील लोकार्पण सोहळयाचा कार्यक्रम हा भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीचाच होता. त्यामध्ये वारकरी सांप्रदायास निमंत्रित करून देखाव्याचे काम केले. वैष्णवांच्या मेळाव्यास भाजपच्या मेळाव्याचे रूप देऊन, भाजपने वारकरी सांप्रदायास दुखविण्याचे काम केले, त्यांची हेटाळणी केली याचा मी जाहीर निषेध करतो. याचे मास्टरमाइंड देवेंद्र फडणवीस आणि तुषार भोसले असल्याचे आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांनी सांगितले.

देहू येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवाद सभेत राज्याचे प्रतिनिधित्व करत असलेले उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना प्रोटोकॉल प्रमाणे बोलू दिले नाही यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर निषेध नोंदवला आहे. याबाबत मावळचे आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर घणाघात केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, देहू नगरपंचायतीच्या नगर अध्यक्षा स्मिता शैलेश चव्हाण उपस्थित होते.

Todays Horoscope 16 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

देहू येथील धार्मिक कार्यक्रम पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीने हातात घेऊन, कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रोटोकॉल प्रमाणे स्थानिक खासदार, आमदार व शहराच्या नगराध्यक्षा यांनी पंतप्रधानांचे स्वागत करणे अपेक्षित होते. मात्र त्याठिकाणी जाण्याचे पास देखील आम्हाला देण्यात आलेले नव्हते. कार्यक्रमाच्या काही दिवसांपूर्वी देहू संस्थांच्या प्रमुखांना प्रोटोकॉल प्रमाणे खासदार आमदार व नगराध्यक्ष यांची नावे देण्यास सांगितले होते आणि पंतप्रधान या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष घालतील असे मला वाटत नाही. स्थानिक लोप्रतिनिधींना डावलणे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न देण्यामागचे मास्टर माईंड देवेंद्र फडणवीस व तुषार भोसले हे आहेत.

मात्र तरी देखील यावेळी देहू संस्थांनच्या अध्यक्षांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू देण्याचा आग्रह करायला हवा होता. पुढे बोलताना आमदार म्हणाले की, देहू संस्थांच्या या धार्मिक कार्यक्रमाचे सर्व नियोजन भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आले होते आणि पंतप्रधान यांच्या प्रोटोकॉलनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण टाळण्यात आले असल्याचे समजल्याने आम्ही या भाजप पुरस्कृत कार्यक्रमास उपस्थित राहिलो नाही.

आमदार म्हणाले, आम्हाला स्टंट करायचा नव्हता, म्हणून आम्ही दूर राहिलो. देवस्थानने आम्हास निमंत्रित अगर विश्वासात घेतले नाही. हा कार्यक्रम भाजपा पुरस्कृत होता. हा कार्यक्रम कोणी केला असा प्रश्न आहे. कारण या कार्यक्रमासाठी सुमारे दोन कोटी रूपये खर्च झाला असून हा सर्व खर्च देवस्थानने केला की, वारक-यांनी केला की भाजपाने केला असा सवाल देखील आमदार शेळके (MLA Sunil Shelke) यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.