Pimpri : कुणाल थोपटे स्पोर्ट्स क्लबला आमदार चषक पुरस्कार प्रदान   

133

एमपीसी न्यूज –    पिंपरी विधानसभेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या नावाने घेण्यात आलेल्या हाफ पिच क्रिकेट स्पर्धेमध्ये कुणाल थोपटे स्पोर्ट्स क्लबला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

HB_POST_INPOST_R_A

संत तुकारामनगर येथील भक्ती शक्ती ग्रुपच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते बक्षिस समारंभ पार पडला.

थोपटे स्पोर्ट्स क्लबला प्रथम क्रमांकाचे २५ हजार रोख व चषक तर कबीर संस्थेला १५ हजार रोख व चषक (द्वितीय), इजाज स्पोर्ट्स ११ हजार रोख व चषक (तृतीय), सुमीत स्पोर्ट्स ७ हजार रोख व चषक (चतुर्थ)
यावेळी शहरप्रमुख बाबर, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी महापौर योगेश बहल नगरसेवक शाम लांडे, सुलक्षणा शिलवंत, किरण सुरवर्णा, रोमी संधु, श्रीकांत मचाले, हरप्रित सिंग, नरेंद्र बनसोडे, अनंत लोणकर, सुनिल गव्हांदे, केशव जगताप, स्वप्नील डोळस आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अभिजीत गोफण यांनी केले.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: