Pune: बँक घोटाळा प्रकरणी आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना अटक

एमपीसी न्यूज – पुण्याच्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील तब्बल 71 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले यांच्यासह चारजणांना गुन्हे शाखेने आज (मंगळवारी) रात्री अटक केली. या प्रकरणी भोसले यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेचे संचालक असलेल्या आमदार भोसले, एस. व्ही. जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तान्हाजी पडवळ, बँकेचे अधिकारी शैलेश भोसले अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे. बँकेतील घोटाळ्याची व्याप्ती तपासात अधिक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भोसले यांच्यासह अटक करण्यात आलेल्या चौघांना उद्या (बुधवारी) दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.