Thergaon : एम.एम.पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांची ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाकडून निवड 

एमपीसी न्यूज – एम. एम. तंत्रनिकेतन (डिप्लोमा) थेरगाव येथील महाविद्यालयाच्या ट्रैनिंग आणि प्लेसमेंट विभागाकडून मागच्या १५ दिवसात जवळपास ३० विद्यार्थ्यांची निवड झाली असून प्रत्येक वर्षाच्या तुलनेत यंदा निवड होणाऱ्यांच्या संख्येत भर पडत असल्याची माहिती संस्थेच्या प्राचार्या गीता जोशी यांनी दिली. 

चांगला निकाल आणि नौकरीची हमी देणारे महाविद्यालय म्हणून संस्थेची ख्याती सर्वदूर पसरत असून सन २००८ पासून सुरु झालेले कॉलेज कॉम्पुटर, मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल हे ३ कोर्सेस चालविले जातात. विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासक्रमासोबत शिस्त व उत्कृष्ट शिक्षण पद्धती यामुळे निवड समिती समोर विद्यार्थी प्रभाव पाडत आहेत. या निवड प्रक्रियेत विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स, बॉश, मारुतीसुझुकी, वोक्सवॅगन, केपीआयटी, दिशा एक्सपोर्ट, ओरिएंटल अशा नामवंत कंपन्यामध्ये निवड झाली आहे. या निवडीकरिता  ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट अधिकारी प्रा.आर.एम.पालवे, प्रा. शिंपुगडे व्ही. आणि प्रा. गुंडला आर यांनी विशेष प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.