Pune News : गाेवर रुबेला लसीकरण;‎ आजपासून दुसरा टप्पा‎ सुरु

एमपीसी न्यूज : महापालिका क्षेत्रात रविवारी (दि. 15)‎ पासून गोवर रुबेला लसीकरण‎ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात‎ होत असून पहिल्या टप्प्यात तब्बल 2‎ हजार 338 बालकांचे लसीकरण झाले‎ आहे.‎ 25 जानेवारीपर्यंत दुसरा टप्पा‎ असणार आहे. (Pune News) गोवर प्रतिबंधासाठी या मोहिमांची आखणी करण्यात आली असून सर्व पात्र बालकांना ही लस दिली जावी, असे आवाहन बालरोगतज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. या मोहिमेत महापालिका क्षेत्रात‎ आरोग्य सेविका, आशा सेविका,‎ अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन‎ सर्वेक्षण करणार आहेत.

9 महिने ते 5‎ वर्षे वयाच्या बालकांचा गोवर रुबेला‎ लसीचा पहिला किंवा दुसरा डोस‎ अथवा दोन्ही डोस राहिलेल्या‎ बालकांची यादी तयार करण्यात आली‎ आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतर‎ 28 दिवस असेल याची खबरदारी‎ घेण्याची सूचना शासनाच्या आरोग्य‎ विभागाने केली आहे.

Chikhali News : गुटखा विक्री करणाऱ्यास अटक

राज्यात नोव्हेंबर अखेरीस सुरू झालेल्या गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर गोवर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये गोवरचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत (Pune News) पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांच्या काही भागांमध्येही गोवरचे रुग्ण आढळून आले. ज्या शहरांमध्ये गोवरचे रुग्ण आढळले त्या शहरांमध्ये उद्रेकाची प्रमुख ठिकाणे सोडल्यास त्यापलीकडे गोवरचा प्रसार फारसा झाला नसल्याने पालकांनी घाबरुन जाऊ नये, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.