Pune News : एमएनजीएल गॅस पाईप दुरुस्तीचे काम करताना अचानक पेट घेतल्याने कामगाराचा मृत्यू

दोघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : एमएनजीएल गॅस पाईपच्या दुरुस्तीचे काम करत असताना अचानक पेट घेतल्याने भाजलेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 24 डिसेंबर रोजी बाणेर येथील ऑर्चिड टॉवर या सोसायटीत हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अमित  प्रशांत कुमार प्रसाद (वय 19) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुण कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कुशल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या सतीश देशमुख आणि आर जे इंटरप्राईजेस च्या जितेंद्र रामचंद्रन कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मुलाचे वडील प्रशांत कुमार कामता प्रसाद (वय 41) त्यांनी याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 24 डिसेंबर 2020 रोजी बाणेर येथील ऑर्चिड टावर या सोसायटीत गॅस पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. या साइटवर अमित प्रसाद हा काम करत होता. यावेळी अचानक पेट घेतल्याने अमित तीस ते पस्तीस टक्के भाजला होता. सूर्या हॉस्पिटल मध्ये त्याच्यावर उपचार सुरू असताना 30 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.

मुलाचा मृत्यू झाल्यानंतर फिर्यादीने चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी कुशल कंट्रक्शन कंपनीच्या सतीश देशमुख आणि आरजे इंटरप्राईजेसच्या जितेंद्र रामचंद्रन कुमार यांच्याविरोधात कामाचे वेळी त्यांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे व बेजबाबदार वर्तनामुळे अमित अमितचा मृत्यू झाला असून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. चतु:शृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.