Pune : मनसेने घातला शिक्षण उपसंचालकांना घेराव

हजारो विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशापासून वंचित 

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे १५ ते २० हजार विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. अद्यापही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी आज मनसेने शिक्षण उपसंचालिका मीनाक्षी राऊत यांना घेराव घातला.  

शिक्षण उपसंचालकांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, हा घेराव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली हा घेराव घातला. अकरावीच्या प्रवेशापासून वंचित असणा-या विद्यार्थ्यांमध्ये एक मोठे नैराश्याचे वातावरण आहे, काही शाळा, कॉलेजेसमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात निधी मागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत नाही. काही कॉलेजेस कटऑफच्या नावाखाली कमी टक्के असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. व अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात येताना दिसत आहे.

काही विद्यार्थी गरीब घरांतून प्रवेश घेण्यासाठी धडपड करत आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळालेच पाहिजे. अन्यथा मनसे या सर्व विद्यार्थ्यांसाठी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.  यावेळी  पद्विधर शिक्षक आमदार दत्तात्रय सांवत, अंकुश तापकीर, अमित तापकीर, प्रतिक शिंदे, शांतिलाल दहीफळे, वैभव ढंगे मनोज लांडगे गणेश वाघमारे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.