BNR-HDR-TOP-Mobile

Pune : मनसेने केला पुण्यातील खड्ड्यांचा शांती विधी

आशिष देवधर यांच्या नेतृत्वाखाली पुणेकरांची लूट ठेकेदाराला सूट आंदोलन

एमपीसी न्यूज – सदाशिव, शनिवार, नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक १५ येथे नुकतेच नवीन रस्ते करण्यात आले आहेत. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम या ठिकाणी करण्यात आले आहे. या कामात आता ड्रेनेजची झाकणे समपातळीवर आणणे व बदलणे या कामासाठी पुन्हा ४० लाख रुपयांची निविदा पुणे महानगरपालिकेने मंजूर केली आहे. त्याला विरोध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कसबा विभागातर्फे अमृतेश्वर मंदिर शनिवार पेठ येथे खड्यांचा प्रतिकात्मक शांती विधी घालून आंदोलन करण्यात आले.

मनसे कसबा विभाग अध्यक्ष आशिष देवधर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. आशिष देवधर म्हणाले, रस्त्यातील ड्रेनेज व झाकणांची दुरुस्तीची जबाबदारी ही ज्या ठेकेदाराने रस्ते बनविले आहेत त्याची आहे. तरीही पुन्हा दुरुस्तीचे काम ठेकेदाराला देण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे पुणेकरांची ही लूट थांबविण्यासाठी प्रशासनाला ही निविदा रद्द करण्याचा इशारा दिला आहे व संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, असे निवेदन क्षेत्रीय कार्यालयात देण्यात येणार आहे.

.