MNS : महाविकास आघाडीच्या आमदारांकडून हिंदू धर्मीयांनी अपेक्षा ठेवल्या नाही पाहिजे – अजय शिंदे

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील ऐतिहासिक पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिर (MNS) परिसरातील दर्ग्याचे अतिक्रमण हटवण्याची मागणी मनसेचे अजय शिंदे यांनी केली. यानंतर त्यांनी नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. अजय शिंदे म्हणाले, की रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणुकीत जिंकल्यानंतर हिरवा रंग लावला होता. त्यामुळे कोणत्याही हिंदू धर्मीयांनी महाविकास आघाडीच्या आमदारांकडून अपेक्षा ठेवल्या नाही पाहिजेत. 

याबद्दल सविस्तर बोलताना अजय शिंदे म्हणाले, की  पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिराचा मुद्दा नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत देखील भाजप आणि महाविकास आघाडीकडून उपस्थित केला होता. त्या निवडणुकीत काँग्रेस  पक्षाचे उमेदवार हे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारामध्ये पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या ठिकाणी मंदिर नसून दर्गाच आहे. मी तुमच्या मशिदी बांधण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असा प्रचार धंगेकर हे करीत होते. तसेच निवडणुकीत विजयी झाल्यानंतर हिरवा गुलाल उधळण्यात आला. त्यामुळे (MNS) त्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्याच नाही पाहिजेत. असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Chinchwad : स्वामी समर्थ हे आनंदस्वरूप आहेत – स्वामी स्वरूपानंद

तसेच ते पुढे म्हणाले की, जर त्यांना मंदिराबाबत काही पुरावे पाहिजे असतील. तर मी त्यांना देऊ इच्छितो. त्याच बरोबर ते ज्या भागात राहतात त्याचा त्यांनी थोडासा अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर त्यांच्या निश्चित लक्षात येईल की, तिथे मंदिरच होते. अशा शब्दात आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर अजय शिंदे यांनी निशाणा साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.