Vadgaon Maval : अत्याधुनिक व्यायाम शाळेचे मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ  येथील म्हाळसकर परिवाराचे ‘जीजा आर्केड ‘ व आर फिटनेस या अत्याधुनिक व्यायाम शाळेचे उदघाटन उद्या शनिवार (दि 2) रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मावळ तालुका मनसेचे अध्यक्ष रूपेश म्हाळसकर यांनी दिली.

वडगाव मावळ येथील त्यांच्या ‘ जीजा आर्केड ‘ म्हाळसकरवाडी येथे उद्या शनिवारी दि 2 जानेवारी, दुपारी 3 वा. कल्याणचे मनसे आमदार प्रमोद पाटील, मनसे नेते महाराष्ट्र राज्य अविनाश अभ्यंकर, महिला आघाडीच्या नेत्या रीटा गुप्ता, कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे, ठाणे व पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश जाधव, खासदार श्रीरंग अप्पा बारणे, मनसे नेते राजेंद्र वागस्कर, मावळचे आमदार सुनील शेळके,

पुणे पालकेचे गटनेते वसंत मोरे, पिंपरी चिंचवडचे सचिन चिखले, पुणे शहर महिला अध्यक्षा रूपाली ठोंबरे, वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.  अशी माहिती रूपेश म्हाळसकर व नगरसेविका सायली म्हाळसकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.