Raj Thackeray News: राज ठाकरे यांना कोरोनाची लागण ; उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज : मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राज ठाकरे यांची आई आणि बहिणीचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राज ठाकरे उपचारासाठी आता लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.

राज ठाकरे यांना कोरोनाची सौम्य लक्षण असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई आणि बहिणीला आम्ही मोनोक्लोनल अँटिबॉडी हे औषध दिलं आहे. तीन तासानंतर राज ठाकरे यांना घरी सोडले जाणार असून त्यांना घरीच क्वारंटाईन करणार असल्याची माहिती देखील पारकर यांनी दिली. राज ठाकरे यांच्या कुटुंबातील किंवा घरातील इतर सदस्यांच्या चाचणीविषयी किंवा त्यांच्या अहवालांविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. असे असले तरी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. तर आता लस घेतललेली असूनदेखील त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे पुणे, नाशिक यांच्यासह विविध शहरांचे दौरे करत होते. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील पुण्यात पार पडली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.