Raj Thackeray : शिवसेना, धनुष्यबाण माझा की तुझा वाद पाहून वेदना झाल्या – राज ठाकरे

एमपीसी न्यूज : शिवसेना फुटीवर आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावरुन तुझं की माझं सुरु असताना प्रचंड वेदना झाल्या, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्क मैदानात मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.

अनेक जण म्हणाले मनसे संपलेला पक्ष आहे. जे बोलले त्यांची अवस्था काय आहे, तुम्हाला माहिती आहे. मात्र सध्याच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ झालाय. हे सगळं राजकारण पाहत असताना मला वाईट वाटत होतं.

 

मात्र ज्यावेळी शिवसेना आणि धनुष्यबाण तुझं की माझं हे चालू होतं त्यावेळी प्रचंड वेदना होत होत्या. इतकी वर्ष तो पक्ष पाहत आलो, जगलो. राजकारण लहानपणापासून पाहत आलो, (Raj Thackeray) अनुभवत आलो. असंख्य लोकांनी कष्टाने उभी केलेली संघटनेत सुरु असलेल्या घडामोडींमुळे वाईट वाटलं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

 

Bhosari : भोसरी गावच्या जत्रेचे 8 एप्रिल ते 9 एप्रिल रोजी आयोजन

 

राज्याच्या राजकारणात सध्या हे गेले, ते आले असं सगळं सुरु आहे. आजपर्यंत आपण अशा प्रकारचं राजकारण पाहिलं नव्हत. नवे उद्योग राज्यात येत नाहीत, बेरोजगारी वाढत चालली आहे. (Raj Thackeray) सर्वसामान्य सरकारकडे पाहत आहे आणि सरकार कोर्टाकडे बघत आहे, आमचं काय होणार?, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

 

एवढं करण्यापेक्षा एकदाच सर्वांनी ठरवा आणि आताच निवडणुका लावूया. राजकारणात जो काही सध्या चिखल झालाय, तोच लोक तोंडात घालतीय, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

 

 

एकदा माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्या, सुतासारखा सगळा महाराष्ट्र सरळ करेन

एकदा राज्य माझ्या हातात द्या सगळा महाराष्ट्र मी सुतासारखा सरळ करेन. कुणीही यावं आणि टपली मारून जावं हे चालणार नाही. आत्ता मी माहिमचं अतिक्रमण दाखवलं ते महाराष्ट्रातल्या मुस्लिम वर्गाला तरी मान्य आहे? कसला दर्गा आहे? कुणाची समाधी आहे माशाची का? असं राज ठाकरे ओरडले तेव्हा लोकांनी पेंग्विन असं उत्तर दिलं. राज्य, राज्यकर्ते जेव्हा दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतलेले असतात तेव्हा बाहेरचे लोक काय करतात ते तुम्हाला दाखवलं. माझ्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे रामनवमी जोरात साजरी करा. 6 जूनला शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. मी रायगडावर जाणार आहे. तुम्ही सगळ्यांनी दक्ष राहा, सावध राहा. एप्रिलमध्ये माझ्या उरलेल्या दोन सभा होत्या त्या मी घेणार आहेत.

 

 

माहिमच्या समुद्रामध्ये दर्गा तयार करण्यात आला आहे. दोन वर्षात हा दर्गा उभारण्यात आला आहे. येत्या महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, माहिमच्या समुद्रातील दर्गा तोडला नाही (Raj Thackeray) तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करणार असं राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिसांनी यावर कारवाई केली नाही तर याद राखा असं आव्हानदेखील राज ठाकरे यांनी दिलं.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.