Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेचा मुहूर्त ठरला?

एमपीसी न्यूज – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्या शस्त्रक्रियेचा अखेर मुहुर्त ठरला असून उद्या ही शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरे आज (दि. 18 जून) मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. दरम्यान, याआधी तपासणीत कोविडचे डेड सेल्स आढळून आल्याने संबंधीत शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. 

टेनिस खेळताना अचानक राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्या पायाला दुखापत झाली होती, त्यावर ठाकरे यांनी तात्काळ उपचार घेतले. दरम्यान, पुन्हा एकदा हे दुखणे बळावले त्यामुळे डाॅक्टरांनी त्यांना हीपबोन शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. या शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे जूनच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल झाले, परंतु चाचणी अहवालात ठाकरे यांच्या शरीरात कोविडचे डेड सेल्स आढळून आले. या सेल्समुळे भूलीचे इंजेक्शन देता येणार नव्हते त्यामुळे खबरदारी म्हणून ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.

SSC Result 2022 : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचा 100 टक्के निकाल

पायाचे दुखणे वाढल्याने राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आज दुपारी ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. दाखल झाल्यानंतर शस्त्रक्रियेपूर्वीच्या चाचण्या करण्यात येतील आणि उद्या शस्त्रक्रिया करण्यात येईल. शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांना दोन महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार असे डाॅक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.