MNS Protest : काळेवाडीत मनसेतर्फे खड्ड्यांचे श्राद्ध

एमपीसी न्यूज : काळेवाडी मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना(मनसे)ने खड्ड्यांचे श्राद्ध घालून रस्त्यांवरील खड्यांच्या विरोधात काल सोमवारी आंदोलन केले.(MNS Protest) हे आंदोलन अनिता पांचाळ, उपाध्यक्ष, महिला सेना, पिंपरी-चिंचवड शहर मनसे यांच्या नेतृत्वाखाली पंचनाथ चौक, नढेनगर येथे संध्याकाळी 7.30 वा. च्या सुमारास करण्यात आले.

आंदोलनाबाबत पांचाळ म्हणाला की, काळेवाडी मधील सर्व भागातील रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. त्याविषयी मी गेल्या दोन ते तीन जनसंवाद सभेत पत्र दिली आहेत. पण त्यावर महानगरपालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मी काल आयुक्त शेखर सिंह यांना पत्र दिले आहे. वाहन चालकांना या खड्डेमय रस्त्यांवरून खूप त्रास सहन करावा लागत आहे. एक दुचाकी घसरल्याने त्यावरून जाणारे किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आहे.

Pune Tata motors : टाटा मोटर्सच्या पुण्यातील कारखान्यात विकसित करणार 4 एमडब्ल्यूपी क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प

महानगरपालिकेने दहा दिवसात खड्डे बुजवले नाही तर मनसेच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा पांचाळ यांनी दिला आहे.(MNS Protest) पंचनाथ चौकात खड्ड्यांचे श्राद्ध घालण्यात आले खड्ड्यांच्या भोवती फुले ठेवण्यात आली व मेणबत्ती लावण्यात आली होती.(MNS Protest) नढे नगर मधील त्रस्त नागरिक वैभव चंद्र पाटील म्हणाले की, काळेवाडी मधील राजवाडे नगर नढे नगर ज्योतिबा नगर व विजयनगर या भागातील रस्त्यांवर खूप खड्डे झाले आहेत. शेजारील पिंपरी, थेरगाव, गावठाण, चिंचवड व रहाटणी येथे चांगले रस्ते आहेत पण काळेवाडीतील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.