Pune News : ‘आमची दिवाळी कडू होणार असेल तर सरकारची दिवाळीही ही कडूच जाईल”

वाढत्या महागाई विरोधात मनसेचे राज्य सरकार विरोधात निदर्शने

एमपीसी न्यूज – दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईचा निषेध करण्यासाठी पुण्यात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला अपयश आले असे सांगत राज्य सरकारचा ही यावेळी निषेध करण्यात आला.

पुण्यातील अलका चौकात मोठ्या संख्येने जमा झालेल्या मनसैनिकांनी यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी यावेळी बोलताना राज्य सरकारला इशारा दिलाय. भाजीपाल्यासह इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव सर्वसामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. या वस्तूंचे भाव सातत्यानं वाढत असतानाही सरकारला त्यावर नियंत्रण ठेवणे जमले नाही. ठाकरे सरकारने आजपर्यंत महागाईच्या विषयावर एकदाही बैठक घेतली नाही.

आमची दिवाळी कडू होणार असेल तर सरकारची दिवाळीही ही कडूच जाईल. सरकारला समजेल अशा भाषेत आम्ही त्यांना यापुढे उत्तर देऊ. पुढील काळात जर महागाई कमी नाही झाली तर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशाराही अजय शिंदे यांनी यावेळी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.