Pune : अधिवेशनासाठी मनसेची पुण्यात जोरदार तयारी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे गुरुवारी (दि.२३) होणार आहे. गोरेगाव पूर्व येथील नेस्को सेंटर येथे सकाळी १० वाजता सुरु होणाऱ्या अधिवेशनासाठी पुण्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनासाठी जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावे मुंबई कार्यालयात पाठवण्यात आली आहेत.

_MPC_DIR_MPU_II

या नोंदणीकृत पदाधिकाऱ्यांनाच अधिवेशनाच्या सकाळच्या सत्रात प्रवेश मिळणार आहे. तर दुपारनंतरचे सत्र सर्वांसाठी खुले असणार आहे. मनसेच्या पुणे शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठक एकत्रितपणे आण्णाभाऊ साठे येथे झाल्या.  या बैठकांना मनसे नेते बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, बाबू वागसकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, रिटाताई गुप्ता आदींनी मागर्दर्शन केले. तर शहरातील विविध संघटना व विभाग स्तरावरील बैठक पुणे शहर कार्यालयात घेण्यात आल्या.

पुणे शहरात या अधिवेशनाची माहिती देणारे होर्डिंग्स मोठ्या प्रमाणावर लावण्यास सुरुवात करण्यात आली असून त्यावर ‘विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा’ हे बोधवाक्य आहे.  मनसेची पुणे शहरातून मोठी संख्या या मेळाव्यासाठी जोरदारपणे निघणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.