Lonavala : बिग बाॅसच्या सेटवर खळखट्याक करण्याचा मनसेचा इशारा (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विषयी अक्षेपार्ह व बेताल वक्तव्य करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ताला बिग बाॅसमध्ये घेतल्यास बिग बाॅसचा सेट उखडून टाकू असा इशारा लोणावळा शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व चित्रपट सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

तनुश्री दत्ताने नुकतेच राज ठाकरे यांच्या विषयी चुकीचे वक्तव्य केले होते. या सीझन तनुश्री दत्ताला बिग बाॅसमध्ये घेण्याची चर्चा असल्याने मनसेने बिग बाॅसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मनविसेच्या वतीने आज (2अॉक्टोबर) तनुश्रीचा निषेध नोंदवत बिग बाॅसचे संयोजक असलेल्या कर्लस वाहिनीच्या प्रमुखांना निवेदन दिले. या निवेदनात तनुश्री दत्ताला बिग बाॅसमध्ये घेऊ नये असे नमूद केले असून तीला कार्यक्रमात घेतल्यास बिग बाॅसचा सेट उखडून टाकू असा सज्जड दम कर्लस वाहिनीला दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.