Lonavala : एकविरा देवी गडाच्या पायर्‍यांची दुरुस्ती न केल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा; भाविकांनी केली पायर्‍यांची डागडुजी

MNS warns of agitation if steps of Ekvira Devi fort are not repaired; The devotees repaired the steps.

एमपीसी न्यूज- लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ला वेहरगाव येथील श्री एकविरा देवी मंदिर व कार्ला लेणीकडे जाणार्‍या पायर्‍यांची मोठी दुरावस्था झाली असून गवत देखील वाढले होते. नवरात्र उत्सवाच्या निमित्त डोंबवली येथील सनी संते, मनविसेचे अध्यक्ष अशोक कुटे, संतोष गायकवाड, पोलीस पाटील अनिल पडवळ, भाऊसाहेब माने व संते यांचे चाळीस सहकार्‍यांनी पायर्‍यांची साफसफाई केली.

यावेळी मावळ मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अशोक कुटे यांनी या अभियानात सहभागी होत असताना आठ दिवसात या पायर्‍या दुरुस्त न झाल्यास मनसेच्या वतीने खळखट्याळ आंदोलनाचा इशारा भारतीय पुरातत्व विभागाला दिला असून पुरातत्व विभागाच्या एकाही अधिकारी व कर्मचार्‍यांना या परिसरात फिरु देणार नाही असा सज्जड दम दिला आहे.

_MPC_DIR_MPU_II

तसेच काम जोपर्यत सुरु होत नाही तोपर्यंत लेणी खात्याचे टिकिट घर देखील सुरु करुन देणार नसल्याचे म्हंटले आहे.

अशोक कुटे यांनी अनेकदा भारतीय पुरातत्व विभागाला याबाबत पत्रव्यवहार केला असून सोमवारी पुणे येथील पुरातत्व विभागाच्या कार्यालयात जाऊन कुटे यांनी पुन्हा अधिकार्‍यांकडे पायर्‍या दुरुस्तीची मागणी केली. यावेळी त्यांच्या समवेत निरंजन चव्हाण, संदिप पोटफोडे, मयूर रगडे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.