MNS : मनसे राज्यात महापालिका निवडणुक स्वबळावर लढविणार

एमपीसी न्यूज – मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेने स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र मुंबईसह सर्वच महापालिका मनसे स्वबळावर लढणार असल्याचे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.त्यामुळे शिंदे गट – मनसे युती होऊन भाजप त्यांच्यासाठी जागा सोडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

मुंबई महापालिका निवडणूका स्वबळावर लढविण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. बीएमसीमध्ये एकूण 227 जागा आहेत. त्या सर्वच जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानेच पक्ष राज्यभर एकट्याने महापालिका निवडणूका लढविणार आहे, असे कळते. राज ठाकरे लवकरच विदर्भ दौरा करणार आहेत. त्याआधीच हे वृत्त येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई. ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, औंरंगाबादसह राज्यातील सर्वच मुख्य महापालिका निवडणूका स्वबळावर लढण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, पक्षाच्या कार्यकर्तांना चैतन्य देण्यासाठी अनेत वेळा पक्षनेतृत्वाकडून स्वबळाची हाक दिली जाते. मात्र महापालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्यांना अवकाश असल्यामुळे आता जरी स्वबळाची घोषणा केली असली तरी भविष्यात युती होऊ शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.