Pune : मनसेचे एकला चलोरे!

एमपीसी न्यूज – काँगेस – राष्ट्रवादी आघाडीत मनसे सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा होती. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते. पण, आज मनसेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले. त्यामुळे हा पक्ष आता एकला चलोरेच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट झाले.
_MPC_DIR_MPU_II
हडपसर मतदारसंघातून पुणे महापालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे, कोथरूडमधून माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि कसबा मतदारसंघातून नेते अजय शिंदे यांना मंगळवारी उमेदवारी जाहीर केली. उर्वरित 5 मतदारसंघात उमेदवार जाहीर केले नाही. खडकवासला, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, वडगावशेरी मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले नाही. काँगेस – राष्ट्रवादीने सुद्धा उमेदवार जाहीर केले नाही. त्यामुळे या पक्षातील बंडखोर उमेदवार मनसेमध्ये जाणार असल्याची खमंग चर्चा आहे. शिवसेनेतील काही जण मनसेत निवडणूक लढविण्यासाठी जाण्याची चिन्हे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.