Pune : क्लासला जाणा-या अल्पवयीन मुलीस अडवून मारहाण

मोबाईल व 5 हजारांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – क्लासला जाणा-या अल्पवयीन मुलीस अडवून मारहाण करीत मोबाईल व पाच हजारांची रोकड जबरदस्तीने ओढून नेल्याची घटना काल (दि.14) दूपारी बाराच्या सुमारास सातारा रोडवरील वुडलॅन्ड शो-रूम जवळ घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी वुडलॅन्ड शो-रूम येथून भर दूपारी तिच्या क्लासला जात असताना दोन अज्ञात इसमांनी तिला अडवले व तिला ओढून हाताने मारहाण करून व तिच्याजवळील मोबाईल व हॅन्डसेट कव्हरमध्ये ठेवलेले 5 हजार रोख असा ऐवज जबरदस्तीने ओढून नेत असताना तिच्या मदतीसाठी आलेल्या इसमालाही त्यांनी मारहाण केली व त्याच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी पुढील तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.