Nigdi : पादचारी तरुणीचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – पायी चालत जाणा-या तरुणीचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी हिसकावला. ही घटना सोमवारी (दि. 22) रात्री सव्वा आठच्या सुमारास संभाजीनगर चिंचवड येथे घडली. 

रसिका राजेंद्र घाडे (वय 17, रा. एकटा हाऊसिंग सोसायटी, संभाजीनगर, चिंचवड) या तरुणीने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रसिका सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास संभाजीनगर मधील बहिणाबाई सर्पोद्यानच्या मागील रोडवरून पायी जात होती. त्यावेळी मागच्या बाजूने एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून एक तरुण आला. त्याच्या अंगामध्ये लाल रंगाचा टी शर्ट होता. त्याने रसिकाच्या हातातील 11 हजार 607 रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावला. यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.