Pimpri : कोयत्याने हेल्मेटवर मारत मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असलेल्या एका नागरिकाच्या हेल्मेटवर कोयत्याने मारून त्याच्याशी हुज्जत घालून मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 20) सायंकाळी सहाच्या सुमारास डेरी फार्म रोडवर पिंपरी येथे घडली.

पांडुरंग रामचंद्र गोरे (वय 56, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग त्यांच्या दुचाकीवरून जात होते. डेअरी फार्म रोडवरून जात असताना तीन चोरटे दुचाकीवरून आले. त्यांनी पांडुरंग यांना अडवून ‘तुम्ही गाडी नीट चालवत नाही’ असे म्हणत यांच्याशी हुज्जत घातली. तसेच त्यांच्या हेल्मेटवर लोखंडी कोयत्याने मारले. कोयत्याचा धाक दाखवून पांडुरंग यांचा पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.