Pune News : चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीकडून पत्नीला मोबाईल गिफ्ट, नंतर कळले की…

एमपीसी न्यूज : चारित्र्यावर संशय घेणार्‍या पतीने पत्नीला मोबाईल गिफ्ट दिला. मात्र या मोबाईलमध्ये स्पाय ॲप अँड रेकॉर्डर नावाचे ॲप डाऊनलोड करून पत्नीच्या मोबाईल मधली गोपनीय माहिती तिच्या परस्पर घेऊन त्याचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर संबंधित पती विरोधात कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील उच्चभ्रू अशा बाणेर परिसरात हा प्रकार घडला. 

याप्रकरणी एका 34 वर्षीय पत्नीने तक्रार दिली असून 37 वर्षीय पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2013 ते 2017 या कालावधीत हा प्रकार घडला.

आरोपी आणि फिर्यादी हे उच्चशिक्षित आहेत. पती पत्नी असताना आरोपी पत्नीकडे पैशाची मागणी करायचा आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ आणि मारहाण करायचा. एके दिवशी त्याने आपल्या पत्नीला भेट म्हणून मोबाईल दिला. या मोबाईल मध्ये त्याने पत्नीची गोपनीय माहिती मिळावी यासाठी स्पाय ॲप अँड रेकॉर्डर नावाचे ॲप डाऊनलोड केले होते. या माध्यमातून त्याने पत्नीची सर्व गोपनीय माहिती स्वतःच्या लॅपटॉप वर आणि मोबाईल वर घेतली. आणि फिर्यादीला न सांगता परस्पर त्याचा गैरवापर केला. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर पत्नीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.

असा उघडकीस आला सर्व प्रकार –

फिर्यादी आणि आरोपी यांच्यात पटत नसल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून ते विभक्त राहतात. कोर्टात त्यांची घटस्पोटासंबंधी प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान आरोपीने कोर्टामध्ये पत्नीचे काही प्रायव्हेट फोटो सादर केले होते. दरम्यान हे फोटो पतीकडे कसे गेले त्याचा तपास करत असताना पत्नीच्या हा सर्व प्रकार लक्षात आला आणि पतीचे भिंग फुटले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.