Pimpri : मोबाईल बॅटरी चावल्याने बॅटरीचा तरुणाच्या तोंडात स्फोट (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – मोबाईलची बॅटरी दाताखाली चावल्याने तरुणाच्या तोंडात अचानक मोठा स्फोट झाला. यामध्ये तरुण जखमी झाला आहे. ही घटना साई चौक, पिंपरी येथील एका मोबाईल शॉपी मध्ये घडली. 
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील साई चौक येथे मोबाईल दुरुस्तीची मोठी बाजारपेठ आहे. 7 मार्च रोजी एक तरुण मोबाईल दुरुस्तीसाठी या ठिकाणी आला होता. त्यावेळी दुकानातील एका कामगार तरूणाने त्याच्या मोबाईलची बॅटरी दाताखाली चावली. त्यामुळे अचानक मोठा स्फोट झाला.
यामध्ये तरुणाच्या तोंडाला इजा झाली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंदविण्यात आलेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.