Shivtejnagar Crime News: पाण्यात फेकून देण्याची धमकी देत मोबाईल फोन, रोकड लांबविली

एमपीसी न्यूज – लघुशंकेसाठी थांबलेल्या एकाला तिघांनी मारहाण करुन पाण्यात फेकून देण्याची धमकी देत मोबाईल फोनसह 27 हजार 400 रुपयांची रोकड लांबविली. हा प्रकार गुरुवारी (दि.19) रात्री साडेनऊच्या सुमारास शिवतेजनगर येथील अटलबिहारी वाजपेयी गार्डनच्या मागील खदानीजवळ घडली.

याप्रकरणी नितीन शांताराम मोरे (वय 32, रा. साने कॉलनी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नितीन गुरुवारी शिवतेजनगर येथील खदानीजवळ लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी 25 ते 30 वयोगटातील तीन आरोपी तिथे आले. नितीन यांना हाताने मारहाण केली. पाण्यात फेकून देईन अशी धमकी देत त्यांच्याकडील मोबाईल फोन, रोकड असा 27 हजार 400 रुपयांचा ऐवज लांबविला. चिखली पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.