Chakan News : पी के टेक्निकल कॅम्पस तर्फे विद्यार्थ्यांसाठी मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला व नाविन्यतेला चालना देण्याच्या उद्देशाने पी के टेक्निकल कॅम्पसच्या डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेतर्फे महाविद्यालयीन व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मोबाईल फोटोग्राफी या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पी के फाउंडेशनच्या संस्था प्रतिनिधी निकिता खांडेभराड यांनी दिली.

या स्पर्धेसाठी संस्थेद्वारे विविध रोख पारितोषिके तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र इत्यादी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला संस्थेद्वारे प्रमाणपत्र देणार देण्यात येणार आहे. स्पर्धा ही पूर्णपणे ऑनलाईन घेतली जाणार असून https://forms.gle/qGrJkgaHDnKjtF1b9 या लिंकवर विद्यार्थ्यांना आपला प्रवेश नोंदविता येईल. तसेच स्पर्धकांनी काढलेला फोटो अपलोड करता येईल. मोबाईल फोटोग्राफ पाठवण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.

ही फोटोग्राफी स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला व नाविन्यतेला चालना देणारी असून सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन पी के फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.