Bhosari : मोबईल हिसकावणारा अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – तरुणाच्या हातातून मोबईल फोन जबरदस्तीने हिसकावून पळून जाणा-या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यासह त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 27) रात्री साडेसात वाजता धावडेवस्ती, भोसरी येथे घडला.

महादेव पंढरी पिंपळे (वय 24, रा. भोसरी. मूळ रा. लातूर) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 27) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अल्पवयीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 27) रात्री साडेसात वाजता पांजरपोळ धावडेवस्ती, भोसरी येथील सार्वजनिक रोडवर फिर्यादी पिंपळे थांबले असता दोन अल्पवयीन मुलांनी पिंपळे यांच्या हातातून 12 हजार रुपये किमतीचा मोबईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. पोलिसांनी त्यातील एकाला ताब्यात घेतले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.