Hinjawadi : मारहाण करून तरुणाचा मोबाईल लंपास

एमपीसी न्यूज- दोन चोरटयांनी तरुणाला मारहाण करून त्याचा मोबाईल व त्यातील पैसे चोरून नेले. याप्रकरणी गुरुवारी (दि.25) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

हनुमंत महादेव खोत (वय-28 रा. ताथवडे) यांनी फिर्याद दिली असून दोन अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक ए.बी.हिंगोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोत हे गुरुवारी पहाटे दीडच्या सुमारास भूमकर चौकातून शनी मंदिराकडे जाणाऱ्या सर्व्हीस रस्त्यावरून पायी जात होते. दरम्यान दोन अज्ञात आरोपी तेथे आले तोंड दाबून मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच फिर्यादी यांचा मोबाईल व रोख सातशे रुपये असा एकूण 5 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.