एमपीसी न्यूज – सोमाटणे फाटा येथील एका मोबाईल शॉपीचा पत्रा कापून त्याद्वारे दुकानात प्रवेश करत दुकानातील 74 हजार 500 रुपयांचे मोबाईल चोरून नेले आहेत. (Mobile theft) हा प्रकार सोमटणे फाटा येथील कनिष्क मोबाईल शॉपी येथे रविवारी (दि.4) ते सोमवारी (दि.5) या कालावधीत घडला आहे.
याप्रकरणी चेतन बाबुलाल परिहार (वय 26 रा.सोमटणे फाटा) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pimple Gurav News : गाडीची काच फोडून दिली धमकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रविवारी दुकान बंद करून गेले असता आरोपींनी दुकानाचा पत्रा कापून दुकानात प्रवेश केला व दुकानातून 9 हजार 500 रुपयांचा, (Mobile theft) एक 13 हजार रुपयांचा असे दोन ओपोचे व एक 26 हजार रुपयांचा विवो कंपनीचा असे एकूण 74 हजार 500 रुपयांचे तीन फोन चोरून नेले आहे. यावरून तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.