Mobile theft : अन ते 57 मोबाईल गेले कुठे…?

एमपीसी न्यूज – धुम चित्रपटात तुम्ही अनेक चोरीचे प्रकार पाहिले आहेत, एक चोरी डिलीव्हरी देणाऱ्या लॉजीस्टीक कंपनीच्या  वेअर हाऊस मध्ये झाली आहे. ज्यामध्ये 11 लाखांचे 57 मोबाईल हे चक्क गायब झाले आहेत. आता म्हणाल हि तर साधी चोरी आहे.(Mobile theft) पण नाही मंडळी दिसत तस नंसत…. या चोरीत एक ट्वीस्ट आहे. तो असा की या डिलीव्हरी कंपनीकडून हे मोबाईल डिलीव्हरीसाठी बाहेर पडले. पण ग्राहकांपर्यंत पोहचता न आल्याने ते परत आले. कंपनी रुल प्रमाणे ते फोन संबंधीत मोबाईल कंपनीकडे गेले. इथपर्यंत मोबाईल दिसत होते मात्र मोबाईल कंपनीने मोबाईलची तपासणी केली तर त्यात चक्क साबणाच्या वड्या अन डमी फोन सापडले…आहे की नाही चक्रावून टाकणारी चोरी.

हा सारा प्रकार ताथवडे येथील हाईवलूप लॉजिस्टीक या कंपनीच्या वेअर हाऊस (हब) येथे सप्टेंबर 2022 ते डिसेंबर 2022 या चार महिन्याचा कालावधीत घडला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि.1) वाकड पोलीस ठाण्यात हाईवलूप लॉजिस्टीक कंपनीचे महाराष्ट्र सेक्युरिटी हेड विक्रांत चंद्रकांत मेवाडा (वय 47) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chikhali News : गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणीटंचाई

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हाईवलूप लॉजिस्टीक हि कंपनी पार्सल डिलीव्हरीचे काम करते.सप्टेंबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालवधीत हाईवलूप लॉजिस्टीक कंपनीच्या वेअर हाऊसमधून मोबाईल वितरणासाठी गेले मात्र ते ग्राहकांचा पत्ता योग्य नसल्याने किंवा इतर कारणांनी ग्राहकार्यंत (Mobile theft) पोहचले नाहीत. ते परत हाईवलूप लॉजिस्टीक यांच्या कडे आले. कंपनी पॉलीसी नुसार ते परत संबंधीत विक्रेते अव्हाको कंपनीकडे पाठविण्यात आले. इथपर्यंत सर्व ठिक होते.

मात्र कंपनीने फोन बॉक्स उघडताच त्यातून साबणाच्या वड्या किंवा डमी फोन मिळाले. असे एक दोन नाही तर 11 लाख 14 हजार 823 किंमतीचे 57 फोन गायब झाले. हा सारा प्रकार हाईवलूप लॉजिस्टीक यांच्या ऑडीट मध्ये समोर आला. की ताथवडे येथे डिलीव्हरी साठी जाणाऱ्या फोनचे रिजेक्शनचे प्रमाण खूप असून फोन परत केल्या नंतर कंपनीकडूनही तक्रार करत संबंधीत फोनचा क्लेम घेतला जात होता.(Mobile theft) हा आकडा 11 लाखांच्या वर गेल्याने वाकड पोलीसात तक्रार देण्यात आली आहे. हि चोरी अत्यंत टेक्नीकली करण्यात आली. कंपनीचे रूलचा अभ्यास करून त्यानुसार मिळणाऱ्या पळ वाटेतून लॉजीस्टीक कंपनीला 11 लाखांचा दणका दिला गेला. त्यामुळे ते 57 फोन गेले कुठे हा तिढा आता  वाकड पोलीस सोडवत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.