Mobile Theft: मोबाईल चोरणारे दोघे अटकेत

एमपीसी न्यूज : कामगार तरुणाचा मोबाईल चोरणाऱ्या  दोन चोरट्यांनी पळवला. ही घटना 5 जुलै रोजी सकाळी निघोजे येथे घडली.(Mobile Theft) चोरी करणा-या दोन्ही चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

 

सागर राहुल राठोड (वय 20, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), महेश कान्हा राजपूत (वय 19, रा. मोहननगर, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अंकितकुमार ब्रिजकिशोर शर्मा (वय 23, रा. खराबवाडी, ता. खेड. मूळ रा. बिहार) यांनी म्हाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे.

Prasad Patil : आयर्नमॅन प्रसाद पाटील यांच्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर – सचिन साठे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शर्मा हे निघोजे येथील मुंगी सहा प्रा ली या कंपनीत काम करतात. 5 जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता ते कंपनीत कामावर जात होते.(Mobile Theft) त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरटयांनी फिर्यादी यांच्या हातातून 17 हजार 999 रुपये किमतीचा मोबाईल फोन पळवला.पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.