BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याने फोनवर बोलत जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल चोरटयांनी हिसकावला. ही घटना बिजलीनगर येथे मंगळवारी (दि. 16) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली.

संदीप आनंद सपकाळ (वय 30, रा. पंचतारानगर, आकुर्डी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 20) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपकाळ हे 16 सप्टेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास बिजलीनगर चौकातून मोबाईलवर बोलत जात होते. दरम्यान, पाठीमागून काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3