Pimpri : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जाणा-या तरुणाचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावला. ही घटना सेहगल शोरूमजवळ चिंचवड येथे शुक्रवारी (दि. 9) रात्री सातच्या सुमारास घडली.

विनोद रामनवल चौहान (वय 27, रा. पवार वस्ती, कुदळवाडी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास विनोद चिंचवड येथील सेहगल शोरूम समोरील रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी अचानक मागून एका काळ्या रंगाच्या अॉक्टिव्हा दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी विनोद यांच्या हातातील सात हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जोरात हिसकावला आणि पसार झाले. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.