Pune :  रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणा-यांचे मोबाईल हिसकावणारे जेरबंद

एमपीसी न्यूज – रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणा-यांचे दुचाकीवर येऊन  मोबाईल हिसकावणा-या दोघांना पोलिसांनी रविवारी (दि.18)  खिलारेवाडी  येथून अटक करून तब्बल 1 लाख 63 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

शुभम रमेश लोढे (वय 21, रा. दांडेकर पुल) व गणेश मानसिंग पवार (वय 23, रा. मार्केट यार्ड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  कोथरूड परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना त्यांच्या बातमीदाराकडून  चोरीचे मोबाईल घेऊन दोघेजण खिलारेवाडी येथे मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी खिलारेवाडी येथे सापळा रचला आणि तेथे मोबाईल विक्रिसाठी आलेल्या शुभम आणि गणेश या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्या दोघांनी पुणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणा-या नागरिकांच्या हातातील मोबाईल हे हिसका मारून तसेच गाड्यांच्या डिक्कीतून चोरी केल्याचे कबूल केले. आरोपींनी हे चोरीचे मोबाईल त्यांच्या ओळखीच्या लोकांना विकले होते. पोलिसांनी त्या दोघांकडून  चोरीचे 7 स्मार्टफोन जप्त केले. हे मोबाईल
त्यांनी पुण्यातील कोंढवा,मार्केटयार्ड, तळजाई टेकडी, कोथरू़ड, धनकवडी या परिसरातून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीसाठी वापरलेली एक बजाज पल्सर मोटारसायकल व चोरीचे सात मोबाईल असा तब्बल 1 लाख 63 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पश्चिम गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.