Dighi : चऱ्होलीतील शाळेतून तीन मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी 35 हजार रुपयांचे मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना चऱ्होली येथील किडस पँरेडाईज स्कूल येथे घडली.

अनंत पांडुरंग काळे (वय 63 रा. यमुनाई निवास, काळे कॉलनी, चऱ्होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळे यांच्या शाळेला गौरी गणपतीची सुट्टी आहे. गुरुवारी (दि. 5) सायंकाळी सहा ते शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी किड्स पॅराडाईज शाळेच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकला. आतील तीन मोबाइल व रोख रक्कम असा 35 हजार 498 रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक आर. एस. कांबळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.