Pune: दीपक मारटकर खून प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्काची कारवाई – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे आदेश

Mocca action against all accused in Deepak Maratkar murder case - Order of Commissioner of Police Amitabh Gupta.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- पुण्यातील कसबा युवा सेनेचे विभाग प्रमुख दीपक मारटकर यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या कारवाईचे आदेश काढले. 

दीपक मारटकर हे युवा सेनेचे पदाधिकारी होते. दोन ऑक्टोबर च्या रात्री कोयत्याने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

पोलिसांनी या प्रकरणी दहा आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे बापू नायर आणि स्वप्निल उर्फ सचिन चॉकलेट मोडवे या गुन्हेगारी टीमचे सदस्य असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.

अश्विनी सोपान कांबळे ( वय 25, बुधवार पेठ), महेंद्र मदनलाल सराफ (वय 57), निरंजन सागर महंकाळे (वय 19) ,सनी कोलते, राहुल रागिर, रोहित क्षीरसागर, रोहित कांबळे, संदीप उर्फ मुंगळ्या प्रकाश कोलते (वय 23) चंद्रशेखर वाघेल आणि लखन मनोहर ढावरे (वय 30) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू नायर याच्या सांगण्यावरून तसेच बुधवार पेठेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आरोपींना आर्थिक मदत पुरवून हा गुन्हा केला असल्याचे तपासात दिसून आले आहे. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी त्यांच्यावर मोक्कानुसार कारवाई करावी असा प्रस्ताव पाठविला होता.

यानुसार डॉ. संजय शिंदे यांनी त्याबाबत कागदपत्रे तपासली असता त्यात बापू नायर टोळीशी निगडित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपींवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या गुन्हेगारी टीमवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची सूचना दिली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.