Dehuroad News : देहूरोड परिसरातील सराईत गुन्हेगार अरबाज शेख टोळीवर मोका

एमपीसी न्यूज – देहूरोड परिसरातील सराईत गुन्हेगार अरबाज शेख आणि टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई केली आहे. याबाबत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी (दि. 3) आदेश दिले आहेत.

टोळी प्रमुख अरबाज बशीर शेख (वय 23, रा. गहुंजे, मावळ, पुणे), सलमान बशीर शेख (वय 22, रा. गहुंजे, मावळ, पुणे), संतोष ऊर्फ सोन्या चंद्रकांत धरणे (वय 32, रा. एलीमेंट बिल्डींगच्या बाजुला, थॉमस कॉलनी, मामुर्डी, पुणे), जे.डी. आरबाज उस्मान खान (वय 19, रा. जामा मस्जिद जवळ, देहूरोड, पुणे), नियाज जमीर शेख (वय 23, रा. सी / ओ सातपते थॉमस कॉलनी, मामुर्डी, पुणे), प्रिन्स ऊर्फ सोनु जॉन्स माखवाणी (वय 25, रा. थॉमस कॉलनी, मामुर्डी, पुणे), हुसेन हमीद सय्यद (वय 21, रा. थॉमस कॉलनी, मामर्डी, पुणे), मौला ऊर्फ लादेन ऊर्फ कादीर कलीम खान (वय 19, रा. साईनगर, गहुंजे ता. मावळ, जि. पुणे), अभिजीत हिरामण बोडके (रा. गहुंजे, मावळ, पुणे), संजय चोपडे (रा. गहुंजे, मावळ, पुणे), समीर जमील शेख (रा. गहुंजे, मावळ, पुणे), पार्थीवन क्रिश्न विरण (रा. गहुंजे, मावळ, पुणे) अशी कारवाई झालेल्या टोळीच्या सदस्यांची नावे आहेत.

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दुखापत, गंभीर दुखापत, चोरी, जबरी चोरी, दुखापत करुन जबरी चोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, खंडणी, जाळपोळ, पळवून नेणे, गर्दी-मारामारी असे एकूण 28 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. हे आरोपी आरोपी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे पुढील तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव देहूरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्तांकडे पाठवला होता.

याबाबत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पीसीबी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पोलीस नाईक अनिल जगताप यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.