Covid 19 : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर 10-11 एप्रिलला देशभरात मॉक ड्रील

एमपीसी न्यूज : देशात कोरोना  पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयही खडबडून जागं झालं आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. (Covid 19) या बैठकीत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे  आरोग्यमंत्री उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत करोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण देशभरात  10 आणि 11 एप्रिलला मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. 

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी नियमावली जाहीर करत असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांचा आढावा घेतला आहे.(Covid 19) आज केंद्रीय आरोग्यमंत्री मांडवीय यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली,” अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली होती.

Hinjawadi : कंपनी कर्मचाऱ्यांनी केला दिड कोटींचा अपहार

10 आणि 11 एप्रिलला संपूर्ण देशात मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. यामध्ये सक्रिय रुग्ण संख्येनुसार आरोग्य यंत्रणा किती प्रमाणात सज्ज आहे ते समजेल. त्यानुसार आरोग्य यंत्रणा वाढवण्यात येईल. एमर्जंन्सी कोवीड प्रिपेडनेस पॅकेजचा निधी अद्याप संपूर्ण संपलेला नाही. (Covid 19) त्यामुळे हा निधी त्या त्या ठिकाणी वापरून आणखीन सुविधा निर्माण कराव्यात,अशा सूचना बैठकीत करण्यात आल्याचं भारती पवार म्हणाल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.