Sihagad Police action : सिंहगड पोलीसांकडून चेतन ढेबे व त्याच्या साथीदारांवर मोक्का

एमपीसी न्यूज : दहिहंडीमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्या चेतन ढेबे व त्याच्या 16 साथीदारांवर सिंहगड पोलीसांकडून मोक्का अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Sihagad Police action) टोळीच्या वर्चस्वासाठी परिसरात दहशत पसरवल्या प्रकरणी ही कारवाई कऱण्यात आली आहे.

Crypto currency fraud : ऑनलाईन खोटे अॅग्रीमेंट करत 23 लाखांची फसवणूक

चेतन पांडुरंग ढेबे (वय 25 टोळी प्रमुख), साथीदार बाळू धोडींबा ढेबे (वय 24), अनुराग राजू चांदणे (वय 20), रमेश धाकलु कचरे (वय 19 कात्रज गाव), वैभव शिवाजी साबळे (वय 20), रोहन दत्ता जाधव (वय 20), अक्षय तायाजी आखाडे (वय 21), सुनील धारासिंग पवार (वय 19) साहिल बबन उघडे व आठ विधीसंघर्षीत बालके यांच्यासह चेतन हा परिसरात टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी खुनाचा प्रयत्न करणे, कोयता व घातक शस्त्रे जवळ बाळगून दंगा करणे, मारामारी करणे असे गुन्हे त्यांच्यावर दाखल होते.(Sihagad Police action) वेळोवेळी प्रतिबंध करूनही गुन्हे न थांबविल्याने पोलिसांनी अखेर ढेबे व त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या गुन्ह्याचा पुढिल तपास सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार यांचा विभाग करत आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.