Modi Top on Twitter : आकडे सांगतात; ट्विटरवरही क्रमांक एकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदींची ट्विटर वरील एंगेजमेंट सर्वाधिक; राहुल गांधी दुस-या क्रमांकावर

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची क्रेझ सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये आहे. मोदींनी केलेले आवाहन देशभरातील बहुतांश नागरिक पाळतात. त्याला त्यांच्या राजकीय कारकीर्द, व्यक्तिगत जीवनशैलीची किनार आहे. राजकीय जीवनात ते अधिक सक्रिय असतात, तसेच पंतप्रधान म्हणून काम करताना देखील त्यांच्या सक्रियतेची चुणूक बघायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर देखील तेवढेच सक्रिय असतात. नुकत्याच आलेल्या एका अहवालात पंतप्रधान मोदी हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे ट्विटर धारक आहेत.

ऑक्टोबर 2020 या महिन्यात त्यांची ट्विटर एंगेजमेंट 72 लाख 15 हजार 913 एवढी आहे. त्यांच्या अर्ध्याहून कमी एंगेजमेंट असलेले राहुल गांधी दुस-या क्रमांकावर आहेत.

ट्विटइटत या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही आकडेवाडी समोर आली आहे. ट्विटइट ही संस्था नियमितपणे विविध क्षेत्रातील दिग्गजांची ट्विटर एंगेजमेंटची नोंद घेत असते. त्यामध्ये राजकीय, बॉलिवूड, व्यावसायिक, क्रिकेटर, अन्य खेळ, टीव्ही स्टार, पत्रकारिता, संस्थापक, कॉमेडियन, प्रादेशिक सिनेमा स्टार, लेखक, गुंतवणूकदार इत्यादी क्षेत्रांचा ट्विटीतच्या सर्वेक्षणात समावेश केला जातो.

ऑक्टोबर 2020 या महिन्याची आकडेवारी ट्विटइटने नुकतीच प्रकाशित केली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व क्षेत्रातील टॉप असलेल्यांमध्ये टॉप आले आहेत. नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर 6 कोटी 37 लाख फॉलोवर्स आहेत. तर ऑक्टोबर महिन्यात त्यांची ट्विटर एंगेजमेंट 72 लाख 15 हजार 913 एवढी आहे.

दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे राहुल गांधी आहेत. राहुल गांधी यांचे ट्विटरवर एक कोटी 67 लाख फॉलोवर्स आहेत. तर ऑक्टोबर 2020 या महिन्यातील त्यांची ट्विटर एंगेजमेंट 35 लाख 53 हजार 825 एवढी आहे.

तिस-या क्रमांकावर क्रिकेटर विराट कोहली असून त्याची मागील महिन्यातील ट्विटर एंगेजमेंट 24 कोटी 65 लाख 918 एवढी आहे. आपल्या सामाजिक कार्यामुळे कोरोना काळात अधिक चर्चत आलेला बॉलिवूड स्टार सोनू सूद चौथ्या क्रमांकावर आहे. त्याची ट्विटर एंगेजमेंट 24 कोटी 36 लाख 601 आहे.

_MPC_DIR_MPU_II

कमी शब्दात अचूक माहिती, विचार शेअर करण्यासाठी ट्विटर हे अधिक सशक्त माध्यम म्हणून समोर येत आहे. सर्व क्षेत्रातील दिग्गज ट्विटरवर पोस्ट करतात. त्यावर त्यांचे चाहते (फॉलोवर्स) प्रतिक्रिया देतात. ट्विटर पाहणे, प्रतिक्रिया देणे, शेअर करणे या सर्व बाबी एंगेजमेंटमध्ये येतात.

विविध क्षेत्रातील ट्विटर एंगेजमेंट मिळवणारे टॉपर (ट्विटर एंगेजमेंट)

राजकीय – नरेंद्र मोदी (72 लाख 15 हजार 913)
बॉलिवूड स्टार – सोनू सूद (24 लाख 36 हजार 601)
बिजनेस हेड – आनंद महिंद्रा (4 लाख 8 हजार 882)
क्रिकेटर – विराट कोहली (24 लाख 65 हजार 918)
स्पोर्ट स्टार (नॉन क्रिकेट) – विजेंदर सिंग – (4 लाख 27 हजार 6)
टीव्ही स्टार – सिद्धार्थ शुक्ला – (3 लाख 90 हजार 901)
पत्रकार – दीपक चौरसिया – (18 लाख 88 हजार 720)
फाउंडर्स – कुणाल शाह – (60 हजार 93)
कॉमेडियन – कुणाल कामरा – (11 लाख 46 हजार 111)
प्रादेशिक सिनेमा स्टार – महेश बाबू – (7 लाख 32 हजार 964)
लेखक – आनंद रंगनाथन – (5 लाख 36 हजार 874)
इन्व्हेस्टर – टीव्ही मोहनदास पै – (99 हजार 741)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1