Pune News : फायझरची एमआरएनए लस उपलब्ध करून द्या; मोहन जोशी यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस देण्यासाठी फायद्याची एमआरएनए ही लस तातडीने उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

आरोग्यमंत्री टोपे यांना पाठविलेल्या पत्रात जोशी यांनी म्हटले आहे की, भारतातील साठ वर्षे वयावरील अनेक ज्येष्ठ नागरिक गेल्या वर्षभरात आपली मुले वा नातेवाईक यांना भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते. तिथे त्यांनी फायझर कंपनीच्या एमआरएनए लसीचे दोन डोस घेतले आहेत. अमेरिकेत गेलेल्यांपैकी जे लोकं भारतात परत आले आहेत त्यांना आता तिसरा डोस घ्यावयाचा आहे.

त्यांच्यापैकी ज्यांना रक्तदाब, डायबिटीस हे आजार आहे, त्यांच्यासाठी फायझरची लस उपलब्ध नाही. कोविन ॲपवर कोवॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक अशा तीनच लस उपलब्ध असल्याचे दाखवले जाते. आपण या मागणीचा विचार करुन फायझर लस उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी जोशी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.