Talegaon : कार्तिक स्नान सोहळा व वसू बारस निमित्त मोहन कडू परिवाराकडून विठ्ठल रुक्मिणीची महापूजा

एमपीसी न्यूज – तळेगाव येथील जोशीवाडी भागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात स्टेशन येथे कार्तिक स्नान सोहळ्यानिमित्त  कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा दररोज पहाटे 5 ते सकाळी 7.30 या वेळात काकड आरती सुरू आहे. आज वसू बारसे निमित्त (दि 25) विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टचे विश्वस्त मोहन गोपाळ कडू व सहपरिवार यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली.

_MPC_DIR_MPU_II

या पूजेचा मान दररोज एका परिवारास दिला जातो व महापूजानंतर प्रसाद व चहा नाष्टाचे आयोजन केले जाते. याप्रसंगी विठ्ठल रुक्मिणी सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी सर्व सभासदनांचे या उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन केले व वसू बारसेचे औचित्य साधून सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विठ्ठल रुक्मिणी सेवा ट्रस्टचे सचिव विजय वाघमारे, दत्त प्रासादिक भजनी मंडळ इंद्रायणी कॉलनी तळेगाव दाभाडे येथील सर्व सभासद उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.