Talegaon: भाजप महिला आघाडी शहराध्यक्षपदी मोहिनी भेगडे-पाटील

mohini bhegde patil elected as a bjp mahila aghadhi president of talegaon dabhade

एमपीसी न्यूज- भाजपच्या तळेगाव दाभाडे शहर महिला आघाडी गाव विभागाच्या अध्यक्षपदी मोहिनी अरविंद भेगडे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे व पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे उपस्थितीत होते. तळेगाव दाभाडे शहर भाजपचे अध्यक्ष रवींद्र माने, कार्याध्यक्ष महेंद्र पळसे यांनी मोहिनी भेगडे यांना नियुक्तीचे पत्र दिले.

यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस ज्योती जाधव, माजी शहराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, माजी नगराध्यक्ष अॅड. रवींद्रनाथ दाभाडे, नगरसेविका शोभा भेगडे, काजल गटे उपस्थित होते.

मोहिनी भेगडे या आमदार कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेवर संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी पूर्वी पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.