Bhosari : भोसरीतील ज्ञान्या लांडगे टोळीवर ‘मोक्का’ची कारवाई

एमपीसी न्यूज – परिसरात दहशत माजवणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ ज्ञान्या लांडगे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शनिवारी (दि. 22) याबाबतचे आदेश दिले.

ज्ञानेश्वर उर्फ ज्ञान्या रामदास लांडगे (वय 28),  गणेश तिम्मा धोत्रे (वय 27, दोघे रा. गवळीमाथा, भोसरी), मल्लेश कोळवी (वय 21, रा. चिखली), कृष्णा विक्रम शिंदे (वय 28, रा. आदिनाथ नगर ,भोसरी) असे मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडगे टोळीतील चारही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांच्या जोरावर ते परिसरात दहशत माजवत होते. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी अलीकडच्या काळात संघटित गुन्हे करण्यास सुरुवात केली होती. या वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला होता. या प्रस्तावास मंजुरी देत अपर पोलीस आयुक्त पोकळे यांनी मोक्काच्या कारवाईचे आदेश दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.