Pune News : गुंड निलेश घायवळ टोळीतील सराईतांवर मोक्का

एमपीसी न्यूज : सराईत गुंड निलेश घायवळ याच्या टोळीतील सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या संदर्भातले आदेश दिले. 

मयूर उर्फ राकेश कुंबरे (वय 27) गणेश राऊत (वय 23) ओमकार उर्फ चिंक्या फाटक (वय 23), मनीष रामकृष्ण माथवड (वय 23), समीर केंद्रे आणि तुषार उर्फ पोळेकर अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यातील आरोपी मयूर उर्फ राकेश कुंबरे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने कोथरूड आणि पौड परिसरात दहशत पसरवली होती. त्याच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणीसाठी धमकावणे, दहशत पसरवणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर गुन्हेगारी कृत्यामुळे समाजात दहशत पसरत असल्यामुळे कुंबरे आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पोलीस उपायुक्त पूर्णिमा गायकवाड यांच्याकडे सादर केला आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील 65 गुंड टोळ्यांवर मोक्का नुसार कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.